Friday, April 14, 2017

"कन्यारत्न" ...

"कन्यारत्न" ...






डॉक्टरांच्या समोर जोडपं बसलं होतं.


"डॉक्टर,
आम्हाला मुलगी नकोय !"
होणाऱ्या बाळाचे बाबा बोलले.


"तुम्हाला कसं कळलं
मुलगीच आहे म्हणून?"
डॉक्टरांनी विचारलं.


"तुम्ही टेस्ट करायला नकार दिलात.
मग आम्ही शेजारच्या राज्यातील सोनोग्राफी सेंटरवर टेस्ट करून आलो."
बाळाचे बाबा बोलले.


"मग तिथंच का केलं नाहीत अबॉर्शन?"
डॉक्टर म्हणाले.

"तिथं सोय नव्हती.
त्यांनी दिला होता पत्ता एका डॉक्टरचा. पण त्यांची फी खूपच जास्त वाटली. मग म्हटलं की तुम्ही ओळखीचे आहात. लाखाऐवजी हजारात काम होईल."
बाळाचे बाबा निर्विकारपणं बोलले.


"मी काय कसाई वाटलो काय तुम्हाला?" डॉक्टर संयम ठेवत पुढं म्हणाले,
"अहो, तुम्हाला पहिली मुलगीच आहे"


ईतका वेळ गप्प बसलेली बाळाची आई म्हणाली, "म्हणून तर दुसरी मुलगी नकोय आम्हाला. दुसरा मुलगाच हवा. दोन मुली नकोत!"


डॉक्टरांनी आईच्या मांडीवर बसलेल्या त्या पहिल्या मुलीकडं पाहिलं. निरागस, निष्पाप, बोलके डोळे. हसरा चेहरा. नजरानजर होताच ती बाहुली डॉक्टरांकडे झेपावली. त्या चिमण्या जिवाला डॉक्टरांनी कवेत घेतलं.


डॉक्टर काही बोलत नाहीत हे बघून मुलीचे बाबा म्हणाले, "फी व्यवस्थित देउ आम्ही. शिवाय ही बातमी कुठेही लीक होणार नाही याची खात्री !"


डॉक्टरांचे डोळे आता लकाकले. होणाऱ्या बाळाच्या आईबाबांना ते म्हणाले, "तुमचा विचार पक्का आहे?
तुम्हाला खरंच दोन मुली नको आहेत?
परत विचार करा."

मुलीचे बाबा म्हणाले,
"पक्का आहे विचार.
दोन मुली नकोत."


"ठीक आहे तर मग.
आपण आईच्या पोटातली मुलगी राहू देउ. या पहिल्या मुलीला मी मारून टाकतो. म्हणजे तुम्हाला एकच मुलगी राहिल." असे म्हणत डॉक्टरांनी टेबलवरची सुरी उचलून त्या पहिल्या मुलीच्या गळ्याला लावली.


आणी त्या मुलीची आई मोठ्यांदा किंचाळली,
"थांबा डॉक्टर...
काय करताय?...
तुम्ही डॉक्टर आहात का कसाई?"


डॉक्टर शांतपणे मंद हसत दोघा आईबाबांकडे बघत होते. निष्पाप बाहुली हसत खेळत होती.


दोनच क्षण ...
दोनच क्षण शांततेत गेले.
अन आईबाबांच्या लक्षात सारा प्रकार आला. ते भयानक खजिल झाले.
ईतकंच म्हणाले,
"आम्हाला माफ करा डॉक्टर.
आम्ही कसाई व्हायला निघालो होतो. आमची चूक आम्हाला कळली."


ते जोडपं कडेवरच्या आणी पोटातल्या आपल्या दोन्ही राजकन्यांसह केबिनमधून बाहेर पडते झाले.

















ते बाहेर पडत असताना डॉक्टर म्हणाले
"आणखी एक सांगायचं राहिलंचं..
आणि तेही तुम्हाला सांगायचं कारण असं कि, मला तुमचा निर्णय बदलल्याची मनोमन खात्री झाली म्हणुनच".


"आमच्या व्यवसायात देखिल काही राक्षस प्रवृत्तीचे लोक आहेत हे दुर्दैव आहे. पण ते ईतक्या नीच थराला गेले आहेत की, सोनोग्राफीत मुलाचा गर्भ दिसत असुनही, पैशासाठी तो मुलीचा आहे असे तुम्हाला सांगितले आहे !"


आता मात्र आईबाबांच्या पायाखालची जमिनच सरकली 

Pandita Ramabai


पंडिता रमाबाई------
रमा बिपिन मेधावी
रमा बिपिन (डोंगरे) मेधावी [१]
टोपणनाव: पंडिता रमाबाई सरस्वती
जन्म: २३ एप्रिल, इ.स. १८५


मृत्यू: ५ एप्रिल, इ.स. १९२२
चळवळ: स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणा
वडील: अनंतशास्त्री डोंगरे
आई: लक्ष्मीबाई डोंगरे
पती: बिपिन बिहारीदास मेधावी
अपत्ये: मनोरमा
पंडिता रमाबाई सरस्वती (२३ एप्रिल, इ.स. १८५८ - ५ एप्रिल, इ.स. १९२२) या परित्यक्ता, पतिता व विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने सतत कार्यरत राहिलेल्या एक मराठी सामाजिक कार्यकर्त्या विदुषी होत्या.

चरित्र ÷
बालपण =
पंडिता रमाबाई यांचा जन्म अनंतशास्त्री डोंगरे व लक्ष्मीबाई डोंगरे यांच्या पोटी, गंगामूळ (कर्नाटक) येथे झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते, स्त्रियांना शिक्षण द्यावे या मताचे ते होते. पत्नी लक्ष्मीबाई व मुलगी रमाबाई यांस त्यांनी वेद शास्त्रांचे शिक्षण दिले होते. रमाबाई नऊ वर्षांच्या झाल्या, तरी त्यांचे लग्न करून दिले नाही म्हणून ज्ञातिबांधवांनी त्यांना वाळीत टाकले होते. त्या काळात रमाबाईंच्या आई-वडिलांना लोकांच्या त्रासामुळे राहण्याची ठिकाणे बदलावी लागली. रमाबाई 17-18 वर्षांच्या असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले.

अनंतशास्त्री डोंगरेंना कदाचित माहीतही नसेल, की ज्या मुलीला आपण संस्कृत शिकवले, काळाच्या पुढे जाऊन 'उदारमतवादी' विचारसरणीची हवा चाखायला देतोय, ती मुलगी पुढे जाऊन इतिहासाच्या पानात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवेल. पण ते घडले.

दीडशे वर्षांपूर्वीचा समाज अज्ञान, पारंपरिक विचारसरणीच्या अंधकारात अडकला होता. मुलींना तर बाहेर पडणे शक्यही नव्हते. त्या काळात अनंतशास्त्र्यांनी मुलीला संस्कृत शिकवले. त्यामुळेच पौराणिक संस्कृतात ही मुलगी पारंगत झाली. फक्त शिक्षण देऊन थांबवले नाही, तर मुलीवर लग्नासाठी दबावही आणला नाही. उलट शक्य तेवढे ज्ञान ग्रहण कर असा उपदेशच केला. रमाबाईंवरचा हा उदारमतवादी पिता मात्र जास्त काळ जगू शकला नाही. रमाबाई सोळा वर्षाच्या असतानाच अनंतशास्त्री वारले. त्यांची पत्नीही गेली. रमाबाई आणि त्यांच्या भावाला आता कुणीही नव्हते.

पण पित्याने दिलेल्या संस्कृताच्या शिदोरीच्या जोरावर रमाबाई उत्तर दिग्विजयाला निघाल्या. त्या काळात त्या भारतभर हिंडल्या. आपल्या बुद्धिमत्तेने त्यांनी अनेकांना चकीत केले. कोलकत्याला तर प्रचंड मोठा समुदाय त्यांना ऐकण्यासाठी आला होता. इथेच त्यांना 'सरस्वती' आणि नंतर त्यांच्या नावाचा अविभाज्य भाग झालेली 'पंडिता' ही पदवी मिळाली. रमाबाईंच्या विद्वत्तेला लोकमान्यता मिळाली.

मातृपितृछत्र हरपल्यानंतर आपल्या ज्येष्ठ बंधूंसह भ्रमण करत त्या कोलकत्याला पोहोचल्या. रमाबाईंना आई-वडिलांकडून, विशेषतः आईकडून, संस्कृत व्याकरण व साहित्याचे शिक्षण मिळाले होते. त्यांच्या संस्कृतवरील प्रभुत्वामुळे कोलकता तेथील सिनेट हॉलमध्ये त्यांचा ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या बिरुदावली बहाल करून गौरव करण्यात आला. त्यांना मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली, हिंदी भाषा, इंग्लिश भाषा, संस्कृत, हिब्रू या सर्व भाषा अवगत होत्या. ‘पंडिता’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या रमाबाई या त्या काळातील एकमेव महिला होत.

विवाह आणि समाजकार्य
इ.स. १८८० साली त्यांनी कोलकत्यातील बिपिन बिहारीदास मेधावी या वकिलांशी लग्न केले. हा त्या काळातील क्रांतिकारी असा विवाह होता. कारण पंडिता रमाबाई या ब्राह्मण तर त्यांचे पती शूद्र मानल्या गेलेल्या जातीचे होते. पण रमाबाईंनी चुकीच्या रूढींना झुगारून देण्याचेच ठरवले होते. दुर्दैवाने इ.स. १८८२ मध्ये मेधावी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आपली एकुलती एक मुलगी मनोरमा हिच्यासह त्या पुण्यास येऊन स्थायिक झाल्या. बालविवाह, पुनर्विवाहास बंदी यांसारख्या घातक चालीरीती व दुष्ट रूढींपासून समाजास मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रथम पुण्यात व नंतर अहमदनगर,सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी या ठिकाणी ‘आर्य महिला समाजाची स्थापना केली. आपल्या विचारांच्या प्रसारार्थ त्यांनी ‘स्त्रीधर्मनीति’ हे पुस्तक लिहिले. इ.स. १८८३ साली त्या इंग्लंडला गेल्या. तेथे एका महिला महाविद्यालयात (चेल्टनहॅम लेडीज कॉलेज) त्यांनी संस्कृत शिकवले. १८८६ मध्ये त्या आपल्या स्त्री-शिक्षणविषयक कार्याला मदत मिळवण्यासाठी अमेरिकेस गेल्या. तेथे त्यांनी हिंदू बालविधवांच्या प्रश्नांचा ऊहापोह करणारे ‘द हायकास्ट हिंदू वूमन’ हे पुस्तक लिहिले. अनेक ठिकाणी व्याख्याने देऊन त्यांनी भारतातील समस्या तेथील लोकांसमोर मांडल्या. भारतातील बालविधवांच्या कार्यात मदत करण्यासाठी काही अमेरिकन लोकांनी बॉस्टन येथे ‘रमाबाई असोसिएशन’ची स्थापना केली होती. पुढील काळात त्यांनी ‘युनायटेड स्टेट्‌सची लोकस्थिती व प्रवासवृत्त’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यांनी मूळ हिब्रू भाषेतील बायबलचे मराठी भाषांतरही केले.


१८८३ साली सरकारी विद्याविषयक हंटर आयोगासमोर त्यांनी प्रभावी साक्ष दिली. मे १८८३ मध्ये स्त्रियांच्या उद्धाराकरिता अधिक प्रभावी कार्य करता यावे, म्हणून इंग्रजी भाषा व वैद्यक या विषयांच्या शिक्षणाकरिता त्या कन्या मनोरमेसह इंग्लंडला गेल्या. हा प्रवासखर्च त्यांनी स्त्रीधर्मनीती हया पुस्तकाताच्या विक्रीतून केला. इंग्लंडमध्ये त्या वॉटिंज गावच्या सेंट मेरी या मठात राहिल्या. येशू ख्रिस्ताच्या पतित स्त्रियांबाबतच्या दृष्टिकोणामुळे तसेच भूतदया व प्रेमाचे शिकवणीने त्या ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित झाल्या. परिणामत: २९ संप्टेंबर १८८३ रोजी वॉटिज येथील चर्चमध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला.


११ मार्च, इ.स. १८८९ रोजी त्यांनी मुंबईला विधवांकरिता ‘शारदा सदन’ नावाची संस्था काढली. त्यांनी केशवपनाविरुद्धही प्रचार केला व संमती वयाच्या चळवळीसही पाठिंबा दिला. इ.स. १८९० च्या नोव्हेंबर महिन्यात ‘शारदा सदन’ पुण्यात आणले गेले. २४ सप्टेंबर, इ.स. १८९८ रोजी केडगाव येथे ‘मुक्तिसदना’ची त्यांनी स्थापना केली. इ.स. १८९७ मध्ये मध्य प्रदेशात व इ.स. १९०० मध्ये गुजरातमध्ये पडलेल्या दुष्काळात निराश्रित झालेल्या स्त्रियांना त्यांनी या आश्रमात आश्रय दिला. त्यांनी स्थापन केलेल्या ‘प्रीतिसदन’, ‘शारदासदन’, ‘शांतिसदन’ या सदनांमधून गरजू व पीडित स्त्रिया राहत असत. या सदनांत दुर्दैवी स्त्रियांच्या राहण्या-जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी त्यांनी आपल्या आश्रमातील-सदनांतील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम यांसह शालेय शिक्षणही देण्याचा प्रयत्न केला.


आपल्या आश्रमातील स्त्रियांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, म्हणून रमाबाईनी शारीरिक श्रमाचे महत्त्व पटवून आश्रमातील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम इ. कामे शिकविली. ’मुक्तिसदना' त धान्य, भाजीपाला, फळफळावळ यांचे उत्पन्न मुलींच्या मदतीने काढण्यात येई. दुर्बल व आजारी लोकांकरिता सायं घरकुलाची व्यवस्था त्यांनी केली.


आपल्या या प्रवासात रमाबाईंना देशभरातील स्त्रियांच्या हलाखीच्या परिस्थितीची कल्पनाही आली. उच्च जाती पुढारल्याचा दावा करीत असल्या तरी त्यातील स्त्रियांचे मागासलेपण किती आहे, हेही त्यांना अस्वस्थ करत होते. रमाबाईंच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले असे वाटत असतानाच त्यांच्या पतीचे निधन झाले. आणि हिंदू समाजातील विधवेला काय काय सहन करावे लागते, याचा अनुभव त्यांना आला. केशवपनापासून अनेक प्रथा हिंदू समाजातील उच्च जातीच्या स्त्रियांना पाळाव्या लागत. रमाबाईंना हे सारे सहन होईना.


याच काळात त्यांनी वंचित, पीडित स्त्रियांसाठी काम करणे सुरू केले होते. या सगळ्या परिस्थितीत रमाबाईंनी पुण्यात विधवा आणि अनाथ महिलांसाठी आश्रम काढला. नंतर मुंबईतही तो सुरू केला. या केंद्रांत महिलांना मूलभूत शिक्षण देण्यात येई. शिवाय समाजात रहाण्यासाठी आवश्यक व्यावसायिक शिक्षणही त्यांना देण्यात येई. अल्पावधीतच रमाबाई वंचित, पीडित महिलांच्या जणू वकीलच बनून गेल्या.


त्यांच्या या समाजकार्यातच त्यांचा ख्रिस्ती मिशनऱ्यांशी संबंध आला. त्यांच्या मदतीने १८८३ मध्ये रमाबाईंना इंग्लंडला जायची संधी मिळाली. तिथे गेल्यानंतर तेथील स्त्रियांची स्थिती त्यांनी पाहिली. हिंदू रूढीवादी मानसिकतेत स्त्रियांचा होत असलेला संकोच त्यांना प्रकर्षाने जाणवला. त्यावर आधारीत त्यांनी उच्च जातीतील हिंदू स्त्रिया नावाचे पुस्तकही लिहिले. त्याचा अनुवाद इंग्रजीत होऊन त्याचा प्रसार इंग्लंड-अमेरिकेत झाला. त्याचवेळी त्यांनी बायबलचाही अभ्यास सुरू केला. आणि याचाच परिणाम म्हणून त्यांनी ख्रिश्चन धर्म अंगीकारला.


त्यांच्या धर्मांतराने तत्कालीन सनातनी समाजात मोठी खळबळ उडाली. टीकेचा भडिमार झाला. पण रमाबाईंनी आपल्या धर्मांतराचे समर्थन केले. धर्मांतर करणे म्हणजे भारतीय संस्कृतीशी आणि तिच्या मुळांशी जोडलेली नाळ तोडणे नव्हे, असे त्यांनी परोपरी समजावून सांगितले. पण तरीही त्यांच्यावर व्हायची टीका ती झालीच.


इंग्लंडहून परतल्यानंतर त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले. कुमारी मातांसाठी केंद्र, स्त्री सहाय्यता केंद्र, गरीब मुलींसाठी शाळा असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. मुंबईत शारदासदन आणि केडगावला मुक्तीमिशन या त्यांच्या संस्था. एकीकडे त्यांच्या समाजसुधारणेचे आयाम विस्तारत असताना त्यांनी ज्या ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला, त्या धर्माचे लोकही त्यांच्यावर टीका करायला लागले. त्याचे कारण वेगळेच होते. रमाबाई ख्रिश्चन धर्मात आल्या तरी त्या ज्यांच्यासाठी काम करत होत्या, त्या महिलांनी ख्रिश्चन धर्मात यावे यासाठी त्या काहीही करत नव्हत्या. त्यामुळे रमाबाईंचे धर्मांतरण हे दांभिक आहे, अशी टीका करण्यास त्यांनी सुरवात केली. रमाबाईंनी बिशप वगैरे परंपराही नाकारली. त्यामुळे त्यांचा अधिकच भडका उडाला. त्यावर रमाबाईंचे म्हणणे स्पष्ट होते. मी ख्रिस्ताच्या चर्चची खरी भाविक आहे. पण बिशप किंवा ख्रिस्ती पुजाऱ्याच्या तोंडून येणाऱ्या प्रत्येक शब्दाचे पालन करण्यास मी बांधील नाही. कारण हिंदू संस्कृतीतील भिक्षुक पुरोहित संस्कृतीतून स्वतःला मी सोडवून घेतले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तशाच प्रकारच्या भिक्षुक संस्कृतीत स्वतःला अडकविण्याची माझी इच्छा नाही.


महाराष्ट्रात नऊवारी ऐवजी पाचवारी साडी नेसण्यास महिलांनी सुरुवात करण्यामागे पंडिता रमाबाई यांचेच प्रयत्न होते. ‘पाचवारी साडी नेसणे सहज, सोपे आहे, सुसह्य आहे व आर्थिकदृष्ट्याही परवडणारे आहे.’ या विषयावर इ.स. १८९१ मध्ये पंडिता रमाबाईंनी पुणे येथे चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्या काळात स्त्रियांच्या वेशात ‘हा’ बदल करणेही त्यांना खूप अवघड गेले होते. पण रमाबाईंनी ही चळवळ चालूच ठेवली. तो केवळ कपड्यांचा मुद्दा नव्हता, तर स्त्री-स्वातंत्र्य, स्वयंनिर्णयाचा हक्क हे मुद्दे महत्त्वाचे होते.


अशा या थोर विदुषीला इ.स. १९१९ साली त्यांच्या कार्याबद्दल तत्कालीन ब्रिटिश राज्यव्यवस्थेतील सर्वोच्च पुरस्कार कैसर-ए-हिंदने गौरविण्यात आले. ‘कैसर-ए-हिंद’ हे सुवर्णपदक होते. पुढे १९८९ मध्ये त्यांच्यावर टपाल तिकीटही काढण्यात आले. स्त्री-शिक्षण, स्त्रियांचे समाजासमोर येणे, कोणत्याही क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग या गोष्टी फारशा प्रचलित नसतानाच्या काळात संस्कृत भाषा, स्त्रियांचे प्रश्न आदी क्षेत्रांत भारतासह परदेशांतही पंडिता रमाबाई यांनी आपल्या विचारांचा व कार्याचा ठसा उमटवला. प्रखर बुद्धिमत्ता, अपार कष्ट, धाडस इत्यादी गुणांसह समाजसुधारणा क्षेत्रात एक उत्तम वस्तुपाठ समाजासमोर ठेवणाऱ्या पंडिता रमाबाई यांचे इ.स. १९२२ मध्ये केडगाव येथे निधन झाले.

चरित्रग्रंथ

पंडिता रमाबाईविषयी थोडक्यात


बुद्धीचा वापर

☣ *बोधकथा* ☣    
 
       
            *व्‍यवहारज्ञानाचे धडे*

एका शहरात दररोज संध्‍याकाळी एक महात्‍मा प्रवचन देत असे. त्‍यांची ख्‍याती एका धान्‍याच्‍या व्‍यापा यानेही ऐकली होती. तो आपल्‍या मुलासोबत प्रवचन ऐकण्‍यास आला. प्रवचन सुरु झाल्‍यानंतर दोघेही लक्षपूर्वक ऐकत होते. काही ज्ञानाच्‍या गोष्‍टी सां‍गत असताना ते म्‍हणाले,’’या जगात जितके प्राणी आहेत. त्‍या सर्वांमध्‍ये आत्‍मा वावरत असतो.’’ ही गोष्‍ट व्‍यापा याच्‍या मुलाला हृदयस्‍पर्शी वाटली. त्‍याने मनोमन हा विचार आचरणात आणण्‍याचा संकल्‍प केला. दुस या दिवशी तो एका दुकानावर गेला तेव्‍हा त्‍याच्‍या वडिलांनी त्‍याला काही वेळ दुकान सांभाळण्‍यास सांगितले. ते स्‍वत दुस या कामासाठी बाहेर निघून गेले. त्‍यानंतर काही वेळाने तेथे एक गाय आली. दुकानासमोर ठेवलेले धान्‍य खाऊ लागली. मुलाने त्‍या गायीला हाकलण्‍यासाठी लाकूड उचलले पण त्‍याच्‍या मनात विचार आला. गाय आणि माणूस दोघांनाही जीव आहे.मग भेदभाव का मानायचा? ती धान्‍य खात असेल तर खाऊ दे. तेवढयात व्‍यापारी तेथे आले त्‍याने गायीला धान्‍य खाताना पाहून मुलाला म्‍हणाले,’’ अरे तुझ्यासमोर ती गाय धान्‍य खाते आहे? आणि तू आंधळा झाल्‍यासारखा गप्‍प बसून का आहेस? आपले किती नुकसान होते आहे याची काही कल्‍पना आहे की नाही? तिला हाकलून का दिले नाहीस?’’ मुलगा म्‍हणाला,’’ बाबा, काल तर महाराज म्‍हणाले की, सगळे जीव एकसारखे आहेत, मी गायीमध्‍ये पण एक जीव पाहिला’’ तेव्‍हा व्‍यापारी म्‍हणाले,’’मूर्खा, अध्‍यात्‍म आणि व्‍यापार यात गल्‍लत एकसारखे करायची नसते.’’
                       *तात्पर्य*
सारासार बुद्धीचा वापर  करून जीवन जगल्‍यास जीवन सुखदायी होते.

सुंदर बोधकथा आहे,



एक दिवस एक कावळा आणि त्याचा मुलगा झाडावर बसले होते.
कावळ्याचा मुलगा वडिलांना म्हणाला "मी आजपर्यंत सगळ्या प्रकारचे मांस खाल्ले... पण, दोन
पायांच्या माणसाचे मांस कधीच खाल्ले नाही.बाबा, कसा स्वाद असतो हो या दोन पायांच्या जीवाच्या मांसाचा?"

वडील कावळा म्हणाला "आजपर्यंत मी जीवनात ३ वेळा माणसाचे मांस खाल्ले आहे. खूपच चविष्ट असते ते!"
मुलगा कावळा लगेच हट्ट करू
लागला कि त्याला पण माणसाचे मांस खायचे आहे.
वडील कावळा म्हणाला, "ठीक आहे, पण थोडा वेळ वाट पहावी लागेल आणि मी जसे सांगेन तसे
तुला करावे लागेल. माझ्या वाडवडिलांनी मला हि चतुराई शिकवून ठेवली आहे ज्यामुळे आपल्याला खाणे मिळू शकेल." मुलगा कावळा "होय" म्हणाला.
त्यानंतर वडील कावळ्याने
मुलाला एका जागी बसवले व तो उडून निघून गेला आणि परत येताना मांसाचे २ तुकडे तोंडात
घेवून आला. एक तुकडा स्वतःच्या तोंडात धरला व दुसरा तुकडा मुलाच्या तोंडात दिला,
तुकडा तोंडात घेता क्षणी मुलगा म्हणाला, "शी बाबा, तुम्ही कसल्या घाणेरड्या चवीचे मांस
आणले आहे. असले खाणे मला नको."
वडील कावळा म्हणाला, "थांब,
तो तुकडा खाण्यासाठी नसून फेकण्यासाठी आहे. हा एक तुकडा टाकून आपण आता मांसाचे ढीग
तयार करणार आहोत. उद्या पर्यंत वाट बघ. तुला मांसच मांस खायला मिळेल आणि ते
सुद्धा माणसाचे."
मुलाला हे काही कळले नाही कि एका मांसाच्या तुकड्यावर मांसाचे ढीग कसे काय निर्माण होणार ?
पण त्याचा त्याच्या वडिलावर विश्वास होता. थोड्या वेळाने कावळा वडील एक तुकडा घेवून
आकाशात उडाला आणि त्याने
तो तुकडा एका मंदिरात टाकला आणि परत येवून दुसरा तुकडा उचलला व तो दुसरा तुकडा एका मशिदीच्या आत टाकला.

मग तो झाडावर येवून बसला.
वडिल कावळा मुलाला म्हणाला, "आता बघ उद्या सकाळपर्यंत मांस खायला मिळते कि नाही ते?"

थोड्याच वेळात सगळीकडे गलका झाला, ना कुणाला कुणाचे ऐकू येत होते, ना कोणी कोणाचे ऐकून घेत होते.

फक्त धर्म भावना विखारी झाली होती. धर्माच्या नावाखाली रक्ताच्या चिळकांड्या उडत
होत्या.... आई, मुलगा, बहिण, भाऊ, वडील, काका, शेजारी, मित्र असे कोणतेच नाते लक्षात न घेत फक्त धर्म बघून एकमेकांवर वार चालू होते.

आमच्या धर्माचा अपमान
झाला त्याचा बदला घेतलाच पाहिजे असे दोघेही म्हणत होते आणि यात निरपराध मारले जात
होते.

खूप वेळ यातच निघून गेला आताशा गाव शांत होवू लागले होते कारण रस्त्यावर फक्त आणि फक्त रक्तच सांडलेले दिसत होते. विशेष म्हणजे ते रक्त लाल रंगाचे
होते... त्यात कुठल्याच धर्माची छटा नव्हती. ते फक्त एकच धर्म पाळत होते ते म्हणजे प्रवाही पणाचा..

गांव निर्मनुष्य भकास झाले होते.... सर्वत्र भयाण शांतता पसरली होती.
या धुमश्चक्रीतून फक्त २ जीव सुटले होते ते म्हणजे झाडावरचे कावळे.
आता कावळ्याचे पोर माणसाची शिकार करायला शिकले होते.

कावळ्याच्या पोराने बापाला प्रश्न विचारला,
"बाबा, हे असेच नेहमी होते का?
आपण भांडणे लावतो आणि माणसाच्या लक्षात कसे येत नाही?"

कावळा म्हणाला, "अरे या मुर्ख माणसाना कधीच आपला धर्म कळला नाही. माणुसकी हा धर्म सोडून ते नको त्या गोष्टी करत बसले आणि आपल्यासारखे कावळे त्यांचा फायदा घेवून जातात, हे त्यांच्या लक्षातही येत नाही.
माणूस म्हणून जगण्यापेक्षा यांनी जात आणि धर्म यांचेच जास्त प्रस्थ माजविले आहे.आणि त्याचा गैरफायदा इतर तिसरे कोणी तरी घेवून जातात."
इतके बोलून दोघे बाप-लेक मांस खाण्यासाठी उडून
गेले.

(शेयर नक्की कराल याची खात्री आहे..)
सुरुवात नव्या परिवर्तनाची...

Thursday, March 9, 2017

साने गुरुजी भाषण

               ------------------साने गुरुजी भाषण ---------------- 


                विध्यार्थी मित्रांनो कोणताही कार्यक्रम म्हटले तर अध्यक्षांची  फार गरज असतें. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय,माझे वर्गशिक्षक, खाली शांतपणे बसलेले माझे प्रिय विध्यार्थी, विद्यार्थिनी मित्रांनो मी आज आपल्या समोर आदरणीय साने गुरुजी यांच्या जीवनवर् दोन शब्द  आपणा सर्वांना सांगणार आहे. कृपया लक्ष द्यावे संपुर्ण जगाला मानव धर्म शिकवणारे साने गुरुजींचे संपूर्ण नाव  पांडुरंग सदाशिव साने होते . मित्रानो त्याचा जन्म कोकणातील पालघर या गावी सन २४ डिसेंबर १८९९ ला झाला.  मित्रानो साने गुरुजींच्या आईचे नाव यशोदा होते. त्याच्या आईने लहानपणीच त्यांना चांगले संस्कार दिले होते. त्यांनी श्यामची आई या पुस्तकात आपल्या आईच्या आठवणी सांगितल्या आहेत . मित्रानो बी. ए. आणि एम. झाल्यावर साने गुरुजींनी अमळनेरमध्ये प्रताप हायस्कुलमध्ये  नोकरी केली. 
                     विध्यार्थी मित्रांनो ते काही साधे शिक्षक नव्हते त्यांनी आपल्या शब्दांच्या जादूने संपूर्ण वर्गाच्या विध्यार्थी व विविधार्थिनींना मोहित करून सोडले. व १९२८ मध्ये त्यांनी विध्यार्थी नावाचे मासिक सुरु केले होते . मित्रानो तो काळ म्हणजे आपला भारत देश इंग्रजांच्या ताब्यात होता. त्याच्यावर महात्मा गांधीचा प्रभाव पडला होता आतांपर्यंत असा एकही शिक्षक आपण पहिला नाही कि त्यांनी स्वतः च्या नोकरीचा त्याग करून स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घेतला  असेल पण साने गुरुजींनी ते करून दाखविले होते. अनेकदा त्यांना तुरुंगात जावे लागले . मित्रांनो तुरुंगात असताना त्यांनी खालील कविता लिहली.  
   बलसागर भारत होवो 
         विश्वात शोभूनी राहो !!      
राष्ट्रार्थ प्राण हे उरले 
मी सिद्ध मारायला हो 
                विध्यार्थी मित्रांनो हि कविता आपण मरेपर्यंत विसरणार नाही हि कविता राष्ट्रीय एकता,राष्ट्रसेवेची प्रेरणा देते. साने गुरुजींनी अनेक अडचणींवर मात केली. त्यांनी  अनेक अत्याचार सहन केले. ते  उत्कृष्ठ साहित्यिक झाले . श्यामची आई हि सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिक येथे तुरुंगात असताना लिहली या महान क्रांतिकारी शिक्षकाने  स्वतः चे जीवन ११जून १९०५ रोजी संपविले. अशा महान आत्म्याला व क्रांतिकारी गुरुजीला मी कोटी कोटी प्रमाण करतो. व माझे भाषण इथेच संपले असे जाहीर करतो ...  
जय हिंद ------------------------------------------ जय महाराष्ट्र -----------------------------------------------------

































































     

Tuesday, March 7, 2017

                        ८ मार्च -`जागतिक महिला-दिन'
Image result for womens day images


संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन' स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन ती करत होती. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळया वर्णाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.

त्यामध्ये क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या, झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.' अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया `बोलत्या' व्हायला लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे..

बोधकथा- मनाची शुद्धता

                                      मनाची शुद्धता

               दोन तरुण साधु उंच डोंगरावर असणाऱ्या आपल्या मठाकडे निघाले होते.रस्त्यामध्ये एक ओढा होता.तो ओढा खूप पाण्याने भरलेला असून खोलही होता.त्याओढ्याच्या काठी एक तरुण युवती बसलेली होती. त्या तरुणीलाही तो ओढा पार करून पलीकडील बाजूस असणाऱ्या गावात जायचे होते.पण ओढ्याला असणाऱ्या पाण्यामुळे ती तो ओढा पार करू शकत नव्हती.
पावसाळ्याचे दिवस होते, पाउस पडत होता, ओढा जोराने खळखळत वाहत होता. तरुणीला तर ओढा पार करून पलीकडे जाणे गरजेचे होते. पाण्याला ओढ जास्त असल्याने ती एकट्याने पाण्यात उतरण्याचे धाडस करत नव्हती.
                दोन साधुंपैकी एका साधूने हे दृश्य पाहिले व त्याने त्या तरुणीला विश्वासपूर्वक दोन गोष्टी सांगितल्या व त्या तरुणीला आपल्या खांद्यावर बसवले आणि त्या तिघांनी मिळून तो ओढा पार केला. तरुणीने तो ओढा पार होताच साधूचे आभार मानले व ती आपल्या गावात निघून गेली. दोन्ही साधू आपल्या आश्रमाकडे निघाले. ज्या साधूने तरुणीला खांद्यावर घेतले होते त्याच्याशी दुसरा साधू बराच वेळ काहीच बोलला नाही. खूप वेळ घुश्यात चालल्यावर त्या साधूने दुसऱ्या साधूच्या मनातील चलबिचल ओळखली व तो त्याला म्हणाला,"मित्र! बरेच वेळ मी पाहतो आहे पण तुला काही तरी खुपते आहे.तेंव्हा विना संकोच तू मनातील गोष्ट मला सांग." तो दुसरा साधू म्हणाला,"हे मित्रा, आपल्या संप्रदायामध्ये स्त्री स्पर्श सुद्धा वर्ज्य आहे. तरी तू त्या स्त्रीला खांद्यावर बसवून ओढा पार केलास हे काही मला आवडले नाही.  स्त्रीकडे बघणे, स्पर्श करणे हे महत्पाप तू केले आहेस. तेंव्हा तू माझ्या मनातून उतरला आहेस."  त्यावर तो मदत करणारा साधू म्हणाला,"असं आहे तुझ्या नाराजीचे कारण! पण मित्रा, ती स्त्री जेंव्हा माझ्या खांद्यावरून उतरली तेंव्हाच मी तिला सोडले, मात्र तू अजूनही तिला मनात बाळगून आहेस. मी तिला मदत करण्याच्या दृष्टीने स्पर्श केला पण तू अजूनही मनातून तिला वारंवार स्पर्श करत आहेस.
            संन्यास याचा अर्थ कुणाचीही सेवा न करता अलिप्त राहणे असा न होता मनातील वासना आणि विकारांवर ताबा मिळवणे असा होतो. ज्यावेळी त्या स्त्रीला मी उचलून खांद्यावर घेतले तेंव्हाही माझ्या मनात फक्त सेवेची भावना होती मग ती स्त्री आहे का पुरुष याचा मी विचार केला नाही. मनातून सुद्धा विकार जर संपविता आले तरच साधुपण आले असे समजता येईल आणि मग त्यासाठी संन्यास घेण्याचीही आवश्यकता नाही. गृहस्थ राहूनही जर विकारांवर नियंत्रण करता आले तर त्या व्यक्तीला साधुपण मिळेल." 〰〰〰〰〰〰〰〰〰〰            
तात्पर्य:
मनातून चांगले आचरण असल्यास बाहेरील आचरण हे चांगलेच होते. मनात पाप ठेवून चांगले बनता येत नाही.
〰〰〰〰〰〰〰〰〰